न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

धनगर मेंढपाळांचे मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन धनगर कन्या डॉ. स्नेहा सोनकाटे,यांचा पुढाकार

धनगर मेंढपाळांचे मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन

धनगर कन्या डॉ. स्नेहा सोनकाटे,यांचा पुढाकार

मुबंई /न्यूज सिक्सर

पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यशासनाने शेळी मेंढी चराई कुरण बंदी उठवावी याकरिता धनगर समाजाच्या विविध प्रश्नांसाठी 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथे आझाद मैदानामध्ये आंदोलन पार पडले या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने धनगर मेंढपाळ बांधव सहभागी झाले होते,या आंदोलनाचे नेतृत्व धनगर कन्या डॉ.स्नेहाताई सोनकाटे यांनी केले.
धनगर समाजाचा प्रमुख उपजिवेकेचे साधन व व्यवसाय हा शेळी-मेंढी पालन असून हा समाज जगला पाहिजे. धनगर समाजाचा स्वातंत्र्योत्तर काळापासून मेंढी पालन करुनच उदरनिर्वाह चालत आहे. स्वातंत्र्य काळापासून मेंढी चराईचा विषय अजूनही सुटला नाही.प्रत्येक निवडणूकीमध्ये विविध राजकीय पक्ष जाहीरनाम्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय व मेंढी चराईचा विषय सोडविण्यासंबंधी घोषणा करीत असतात, पण आजपर्यंत यावर काही तोडगा निघाला नाही. या आंदोलनात धनगर समाज एस.टी.आरक्षण,धनगर समाजातील विद्यार्थ्यासाठी विभागीयस्तरी वसतिगृह चालू करण्यात यावीत.तसेच संभाजीनगर येथे पशू वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पावसाळ्यामध्ये मेंढपाळाच्या मेंढी चराईसाठी क्षेत्र उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात मेंढ्या मरण पावतात प्रामुख्याने महाराष्ट्रातील सोलापूर,सांगली, बारामती,हिंगोली,नांदेड , धाराशिव,लातूर,परभणी, धुळे, जळगांव,नागपूर, यवतमाळ, वर्धा,अमरावती या जिल्ह्यातील तालुक्यामध्ये धनगर समाजाचे उपजिवीकेचे साधन मेंढी पालनावर अवलंबून असून धनगर समाजाच्या मेंढयाकरीता मेंढी चराईचे क्षेत्र शासनाकडे उपलब्ध असून सुध्दा मेंढपाळाना सदरचे क्षेत्रात मेंढी चराईसाठी क्षेत्र उपलब्ध नसते म्हणून सदरचे मेंढपाळाना चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे अन्यथा येत्या आठ ते दहा दिवसात शासनाकडून मेंढी चराई क्षेत्र उपलब्ध न झाल्यास आम्ही धनगर मेंढपाळ बांधव मंत्रालयासमोर लोकशाही मार्गाने मोठे आदोलन करण्याचा इशारा यावेळी डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांनी दिलाआणि यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असेही त्या यावेळेस बोलल्या. यावेळी माजी आ.प्रकाशअण्णा शेंडगे, श्री संदीप सावळे , बाळासाहेब शिंदे,वसंतराव ढोके,अर्जुन सलगर,सुशील सिरसागर, सुखदेव नवरंगे, कृष्णा पावडे, निखिल मस्के, मल्लिकार्जुन पुजारी,निहारिका खोंदले,विजया सोनकाटे,सुशीला जोशी,सुशील क्षीरसागर,गणेश लिमने, उपस्थित होते. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील धनगर मेंढपाळ समाज उपस्थित होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे