शिवसेना(उ. बा.ठा.) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ फळे वाटप
Post - गणेश खबोले

लोहारा / प्रतिनिधी
शिवसेना(उ. बा.ठा.) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना(उ. बा.ठा.) लोहारा तालुका पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवित लोहारा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वसंतराव काळे विद्यालयातील एकुणच १ हजार विद्यार्थ्यांना खाऊ फळे वाटप करण्यात आले.
२०१९ मध्ये शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी एकत्रितपणे महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले.उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांनी राज्यात महागाई आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यांनी राज्यात शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठीही काम केले.ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना कोरोनाव्हायरस महामारीचा सामनाही केला. त्यांनी राज्यात कोरोनाव्हायरस प्रतिबंधक उपाययोजना केल्या आणि कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार मिळवून दिले.त्यांचे योगदान महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही असे मत शिवसेना(उ. बा.ठा.) लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी ,मा.उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, मा.पस सभापती विलास भंडारे,शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख,माजी नगरसेवक श्याम नारायणकर,माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गवंडी,माजी वि.का.से.सो.सदस्य रघुवीर घोडके,युवासेना सोशल मिडीया तालुका प्रमुख प्रेम लांडगे,नितीन जाधव,दिनेश गरड,महेश चपळे,महेबुब शेख,अनिल गोरे,प्रवीण गोरे,नागेश थोरात,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मधुकर रोडगे यासह शिवसैनीक,वाहणधारक व नागरीक उपस्थित होते.