तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी पोलीस बंदोबस्तात अधिकारी, कर्मचारी, होमर्गाड मिळून यंदा १५९३ तैनात – पी आय . गजानन घाडगे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी पोलीस बंदोबस्तात अधिकारी, कर्मचारी, होमर्गाड मिळून यंदा १५९३ तैनात – पी आय . गजानन घाडगे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपिठापैकी एक पुर्ण पिठ ओळखले जाणाऱ्या आई श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र २०२३ मध्ये मोठ्या उत्सहात साजरा होणार आहे या सोहळ्यसाठी १५ ते २० लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवात भाविकांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे. पोलीस बंदोबस्तात अधिकारी, कर्मचारी, होमर्गाड मिळून एकुण यंदा १५९३ तैनात प्रकारे बंदोबस्त असणार आहे.यामध्ये मंदिर परिसर,वळदळ आणि इतर महत्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तुळजापूर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत असे सांगण्यात येत आहे.शहरातील महोत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस तैनात असणार आहेत. चोरट्यावर आळा बसेल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे तसेचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी , पोलिस उपधीक्षक डॉ निलेश देशमुख यांच्या आदेशाने तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी पत्रकार ज्ञानेश्वर गवळी यांच्याशी बोलताना सांगितले.