धनगरी ढोलच्या गजरात भंडा-याची उधळण करीत धनगर समाजाचा विराट मोर्चा

धनगरी ढोलच्या गजरात भंडा-याची उधळण करीत धनगर समाजाचा विराट मोर्चा
तुळजापूर /न्यूज सिक्सर
धनगरी ढोल च्या गजरात भंडा-याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार , देत कस नाही घेतल्याशिवाय राहत नाही” ,अशा घोषणा देत धनगर,आरक्षण कृती समिती वतीने धनगर समाज बांधवानी सोमवार दि १८रोजी धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण द्या तसेच तिर्थक्षेञ तुळजापुर आणि नळदुर्ग शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे या प्रमुख सह अन्य मागण्यांन साठी धनगर समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढुन रस्ता रोको आंदोलन केले, या आंदोलनात हजारो धनगर बांधव हातात पिवळे झेंडे डोक्यावर पिवळी टोपी गळ्यात पिवळा गमजा घालुन सहभागी झाल्याने आज शहर पिवळमय बनले,होते सोमवार दि१८रोजी सकाळी छञपती शिवाजी महाराज पुतळ्या पासुन या भव्य मोर्चास आरंभ झाला हा मोर्चा भवानी रोड मंदीर महाध्दार, आर्य चौक, कमानवेस, मार्ग क्रांती चौक येथुन जुन्या बसस्थानक समोरील चौकात आला येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाज बांधवान वतीने तहसिलदार यांनी रस्ता रोको आंदोलन स्थळी मागण्यांचे निवेदन दिले यावेळी धनगर समाजाचा एसटी समावेश करुन त्याची अमलबजावणी न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला धनगर समाजाची मागणी न्यायी- आ पाटील या आंदोलनात सहभागी होवुन बोलतानाआ राणाजगजितसिंहजीपाटील म्हणाले की धनगर समाजाच्या मागण्या शंभर टक्के न्यायी व योग आहेत धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी मी शाषणा पर्यत पोहचवुन तुम्हाला एस टी प्रर्वर्गात समाविष्ट करुन देण्यासाठी एस टी सवलती मिळवुन देण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही धनगर समाज बांधवांना दिली,या आंदोलनात राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी शरदपवार गट च्या वतीने संदीप गंगणे व शरद जगदाळे यांनी सहभाग नोंदवुन पाठींबा दिला , .————————————————– सर्वच पक्षाच्या राज्यकर्तानी धनगरांना जाणीवपूर्वक एस टी प्रवर्गात समाविष्ट करुन न घेतल्याचा आरोप – धनगर आरक्षण कृति समिती तर्फ शाषणाला दिलेल्या निवेदनात म्हटल आहेकि आज ही बहुतांश धनगर समाज हा पारंपारिक मंडपाळ व्यवसाय करीत आहे समाजातील मुली व मुले अधाप शिक्षण व नोकरीवासून वंचित आहेत.याचे एकमेव कारण म्हणजे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट न केल्यामुळे आजही समाजमागासलेपणाचे जीवन जगत आहे. खरे पाहता धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये
होता, परंतु आजपर्यंतच्या राज्यकर्तांनी जाणीवपूर्वक धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये
समाविष्ट करून घेतले नाही.तरी या सरकारने आम्हाला समाविष्ट करुन न्याय देण्याची मागणी केली सदरील निवेदन कृती समिती अध्यक्ष गणेश सोनटक्के, सोमनाथ गुडे, राम जवान, डाँ डोलारे, बाबा श्रीनामे अँड बर्वे, काकासाहेब बंडगर, चेतन बंडगर,प्रमोद दाणे, दत्ताभाऊ हुंडेकरी, अण्णा बंडगर, अप्पासाहेब पाटील, संजय घोडके,सचिन घोडके सह अनेकांनी दिले