सोजरबाई गायकवाड पुण्यस्मरणनिमित्त २५१ बालगोपाळांना स्कूल बॅगचे वाटप

सोजरबाई गायकवाड पुण्यस्मरणनिमित्त
२५१ बालगोपाळांना स्कूल बॅगचे वाटप
जळकोट/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील सामाजिक कार्यकर्ते व वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले डॉ. चंद्रशेखर गायकवाड यांच्या मातोश्री सोजरबाई गोविंदराव गायकवाड यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गावातील जिल्हा परिषद शाळेतील पहिलीचे विद्यार्थी व अंगणवाडीतील २५१ बालगोपाळांना स्कूल बॅगचे वाटप करुन, बालगोपाळामध्ये रमण्याचा आनंद मिळवला.
या कार्यक्रमास राम चव्हाण, भाजपाचे जिल्हा चिटणीस विलास राठोड, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू सातपुते, पार्वती कन्या प्रशालेचे सहशिक्षक विजयकुमार मोरे, प्राचार्य संतोष चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पिंटू चुंगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैया किलजे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, सौ. दीपा गायकवाड, कस्पटे, सुनील माने, राजू चव्हाण, शिंदे, गिरी, महेश कारले, हनुमंत अंगुले, संतोष वाघमारे, भरत सोमवंशी, संतोष दरेकर, मनोज चव्हाण, अरविंद लोखंडे, मोहन गायकवाड, दयानंद गायकवाड, रमेश वाघमारे, विशाल गायकवाड, अनिल खजुरे, राहुल गायकवाड, सचिन काळे, राजू चिमुकले, ज्ञानेश्वर पात्रे, अतुल गुरव आदि मान्यवर, अंगणवाडीताई, सेविका, शिक्षक युवक उपस्थित होते.