साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी दिपक रोडगे,उपाध्यक्षपदी शुभम आगळे
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळलेतांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर,अशिक्षित व्यक्ती,अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय,कथा,नाट्य,लोकनात्य,कादंबऱ्या,चित्रपट,पोवाडे,लावण्या,वग,गवळण,प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते.पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला.स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली.
आशा थोर साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लोहारा येथील जयंती उत्सव समितीची कार्यकारणी नुकतीच मा पंस सदस्य दिपक वैशाख रोडगे यांच्या झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
पुढील कार्यकारणीत प्रमाणे निवडी करण्यात आल्या आहेत.सचिव पदी अभिजीत सगट,खजिनदारपदी बालाजी कसबे व नितीन रोडगे,सजावट प्रमुख पदी विमल शिंदे,रेखा सरवदे,पिंकी खुशबा यांची निवड करण्यात आली.यावर्षी जयंती आकर्षक पद्धतीने साजरी करण्याचा व सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीला लक्ष्मण रोडगे,आकाश रोडगे,महेश सगट,विक्रम रोडगे,सचिन रोडगे, अक्षय सगट,रवी रोडगे,अमोल रोडगे,आकाश रोडगे,इत्यादी उपस्थित होते