तुळजापूर शहरातील लातूर रोड लगत असलेल्या पद्मशाली धर्मशाळेतील कर्मचाऱ्यांनी केला खुलेआम दारुड्यांचा अड्डा !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर शहरातील लातूर रोड लगत असलेल्या पद्मशाली धर्मशाळेतील कर्मचाऱ्यांनी केला खुलेआम दारुड्यांचा अड्डा !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूर आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीत नवरात्र शारदीय महोत्सवाच्या तोंडावर लातूर रोड उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या शेजारी पद्मशाली धर्मशाळेतील कर्मचाऱ्यांनी पद्मशाला धर्मशाळेत केला कर्मचाऱ्यांनी दारुड्याचा अड्डा ..शारदीय नवरात्र महोत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी पद्मशाली धर्मशाळा येथे भाविक विश्रांती घेतात मात्र पद्मशाली धर्मशाळेतीलच कर्मचारी खुलेआम दारू पित बसल्याचे पितळ उघड पडला आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेतेच्या विषयी शंका निर्माण होत आहे.पद्मशाली धर्मशाळेची उप जिल्हा रुग्णालयाची पाठ भिंत असल्याने त्या ठिकाणीही रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना दारुड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कडक कारवाई करण्यात यावी अशी भाविक भक्तांकडून मागणी होत आहे.