छत्रपती सार्वजनिक गणेशाची महाआरती पत्रकार ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते करण्यात आली !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

छत्रपती सार्वजनिक गणेशाची महाआरती पत्रकार ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते करण्यात आली !
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील छत्रपती नगर येथील छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळा तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही सोसायटीच्या गणेशाच्या महाआरती आणि महाप्रसाद चे आयोजन केले होते यावर्षी मंडळाच्या वतीने महाप्रसाद आणि महाआरतीसाठी अतिथी म्हणून तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक एकमत तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते महाआरतीचा करण्यात आली
पत्रकार गवळी यांना आरतीसाठी निमंत्रित करुन यथोचित मानसन्मान देऊन त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली, आरती नंतर त्यांच्या हस्ते श्रीगणेशा ला महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला , महाप्रसादाची सुरुवात ही अतिथींच्या भोजनाने करण्यात आली. छत्रपती नगर गणेशोत्सव मंडळाने दरवर्षी आरती बंधुत्वाची, आरती समरसतेची करण्याचा संकल्प केला आहे, समरस समाज बनण्याच्या दिशेने हे खुप मोठे पाऊल ठरताना दिसत आहे, यावेळी छत्रपती नगर येथील महिला, नागरिक तसेच अँड नितिन साळुंके व मंडळाचे पदाधिकारी योगीराज माने, अजिंक्य नवगीरे, सुरज भापकर, चैतन्य कोकाटे, सागर साळुंके, औदुंबर पवार, सोमा माळी, विनायक स्वामी, सत्यजित भापकर, बाळासाहेब पवार, अभिजित भांगे , जयवंत भांगे, सतिश बोधले तसेच मा.जोतिबा फुले अनाथ आश्रमचे विद्यार्थी आणि कर्मचारी देखील निमंत्रित म्हणून उपस्थित होते .