
लोहारा-प्रतिनिधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथा वर्धापनदिन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह आयोजन करायचा आहे. या दिनानिमित्त पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य स्वतः तयार केले. दुसरा दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी आज निपुण प्रतिज्ञा म्हटली व गणिती खेळ व भाषिक खेळ यांचे आयोजन करण्यात आले. तिसऱ्या दिनानिमित्त क्रीडा दिवस म्हणून साजरा करायचा आहे तर त्यानिमित्त शाळेमध्ये भारतीय खेळाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये गोट्या लगोरी कबड्डी खो-खो लंगडी, लगोरी कॅरम चेस इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले. असेच सात दिवसाची नियोजन यामध्ये करण्यात आलेली आहे दररोजच्या ठरवून दिलेल्या उपक्रमानुसार रोज एक उपक्रम राबवला जातो. तालुक्याची नूतन गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण व लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वजीत चंदनशिवे यांनी शिक्षण सप्ताह प्रत्येक शाळेमध्ये राबवण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी शिक्षक अनंत कानेगावकर खिजर मोरवे सुनंदा निर्मले कलशेट्टी मल्लिकार्जुन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.