एस एस मोबाईल चोरी प्रकरणी अट्टल दोन चोरटे जेरबंद,; तुळजापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
एस एस मोबाईल चोरी प्रकरणी अट्टल दोन चोरटे जेरबंद,; तुळजापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

एस एस मोबाईल चोरी प्रकरणी अट्टल दोन चोरटे जेरबंद,; तुळजापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक छोटे-मोठे गुन्ह्यांचा शोध तुळजापूर पोलिस अधिकारी,कर्मचारी नेहमीच सतर्क असल्यांचे दिसून यत आहेत तुळजापूर पोलीस पथकांतील पोलिस कर्मचाऱ्यांकडून अनेक गुन्ह्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकींस आणण्यांस पोलिस नेहमी सतर्क असतात.दि.२०/०३/२३ रोजी पहाटे ०४.०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरटयांनी सचिन नानासाहेब शिंदे यांची एस एस कम्युनिकेशन ॲण्ड सव्हीर्सेस मोबाईल दुकानचे शटर अर्धवट प्रवेश करुन अॅपल कंपनीचे व इतर महागडे कंपनी चे ११९ मोबाईल फोन व मोबाईल अॅक्सेसरीज अशा एकुण ३०,३१,३८१ /- रुपये चा माल चोरुन घेवुन गेला म्हणुन तुळजापुर पोलिस ठाण्यात गुरन १०६/२३ कलम ४६१, ३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक, धाराशिव अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक नवनीत कौंवत,उपविभागीय पोलीस अधिकारी, सई भोरे – पाटील, पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापुर पोलीस स्टेशन चे सहपोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पो. हेड कॉंस्टेबल १२४५ अतुल यादव, पोहवा १२६४ धनंजय लाटे, पो. अं. १०२६ संतोष पवार, पो.ना. ८३७ आनंद सांळुखे, पो.ना. १५६० गणेश माळी व पो. अं. १५८ सतिश शिंदे यांनी आरोपी अकबर खान हाबिब खान रा. मालेगाव जि. नाशिक , आबु शाहिद असरफ आली शेख रा. शिवाजीनगर मुंबई यास अटक करण्यात आली आहे. तपासा दरम्यान गुन्हयातील इतर आरोपी अतिक अहमंद मोहमंद रफीक आणि इमरान खान सुलेमान खान दोघे रा. मालेगाव जि. नाशिक हे फरार आहेत. सह पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोहवा अतुल यादव, पोहवा धनंजय लाटे, पो. अं. संतोष पवार हे मालेगांव जि नाशिक येथे जावुन गुन्हयातील फरार आरोपी अतिक अहमंद मोहमंद रफीक आणि इमरान खान सुलेमान खान यांचा शोध घेतला परंतु ते फरार असल्याने गोपनिय बातमीच्या आधारे फरार आरोपी इमरान खान सुलेमान खान यांचे घराची घर झडती घेवुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या माला पैकी एक सॅमसग कंपणीचे २८ मोबाईल , विवो कंपणीचे ३७ मोबाईल , वन प्लस कंपणीचे ०१ मोबाईल , ओपो कंपणीचे १८ मोबाईल , रेडमी कंपणीचे ०९ मोबाईल , अॅपल कंपणीचे १० मोबाईल , नोकिया कंपणीचा ०१ मोबाईल असे विविध कंपणीचे एकुण १०४ मोबाईल त्यांची एकुण किमंत २३,०६, ३९६/- रुपयेचा माल जप्त केला असुन पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सह पोलिस निरिक्षक कांबळे करीत आहे.