शिवसेना सह संपर्क प्रमुखपदी अमरराजे कदम परमेश्वर यांची नियुक्ती कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्षाची ताकद वाढणार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

शिवसेना सह संपर्क प्रमुखपदी अमरराजे कदम परमेश्वर यांची नियुक्ती
कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्षाची ताकद वाढणार
तुळजापूर : प्रतिनिधी
हिंदुह्यय सम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनाप्रमुख महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सह संपर्क प्रमुखपदी अमरराजे अंबादास कदम परमेश्वर यांची दि.१७ जुलै रोजी
शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते अमरराजे कदम परमेश्वर यांना मुंबई येथील बाळासाहेब भवन पक्ष कार्यालयात धाराशिव जिल्हा सह संपर्कप्रमुख पदाचे नियुक्तीपत्र देत असताना बुलढानाचे खासदार प्रतापराव जाधव,शिवसेनेचे सचिव संजयजी मोरेसाहेब उपस्थित होते.सह संपर्क प्रमुख अमरराजे कदम परमेश्वर यांचे कार्यक्षेत्र तुळजापूर व उमरगा विधानसभा असणार आहे.
येत्या दोन महिन्यात सदस्य नोंदनी तसेच तुळजापूर तालुक्यातील गाव तेथे शाखा तसेच घरा घरा पर्यंत शासकिय योजनांची माहिती देवून राबविण्याचे काम व पदाधिकायांचा निवडी करण्यात येणार आहेत.