ब्रेकिंगमहाराष्ट्र
राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे लोकार्पण
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे लोकार्पण
तुळजापुर : ज्ञानेश्वर गवळी
येथील आर्य चौकातील पाचशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक राम मंदिरातील राम लक्ष्मण व सीता या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनांक 20 ते 22 जानेवारी यादरम्यान होणार आहे. यानिमित्त जिल्हा व तालुका वाशी यांना या कार्यक्रमाची माहिती होण्यासाठी विशेष पत्रिका छापण्यात आली आहे.
या पत्रिकेत तीन दिवस होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे सविस्तर वेळेनुसार माहिती देण्यात आली आहे या कार्यक्रम पत्रिकेचा लोकार्पण सोहळा शनिवारी सायंकाळी रामभक्त समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी या कार्यक्रम पत्रिका तालुक्यातील विविध गावात जाऊन तेथील ग्रामदैवतांना अर्पण करून तेथील ग्रामस्थांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.