तालुकाध्यक्षपदी येथील श्रीकृष्ण सूर्यवंशी व तालुका कार्याध्यक्षपदी संदीप गंगणे यांची निवड करण्यात आली
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तालुकाध्यक्षपदी येथील श्रीकृष्ण सूर्यवंशी व तालुका कार्याध्यक्षपदी संदीप गंगणे यांची निवड करण्यात आली
तुळजापुर : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार तालुकाध्यक्षपदी येथील माजी नगरसेवक श्रीकृष्ण वसंतराव सूर्यवंशी यांची निवड झाली आहे तर तालुका कार्याध्यक्षपदी संदीप दिलीप गंगणे यांची निवड झाली आहे
या नियुक्तीचे पत्र संपर्कमंत्री व राज्यमंत्री संजय बनसोडे, राज्य उपाध्यक्ष सुरेश बिराजदार प्रदेश सदस्य गोकुळ शिंदे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. गेल्या बऱ्याच दिवसापासून ही दोन्हीही पदे रिक्त असल्याने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात अस्वस्थ पसरली होती व यासंदर्भात या पदाची नियुक्त करण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. शेवटी दि. ७ जानेवारी रोजी या दोन्हीही सदस्याची नियुक्ती करून आगामी लोकसभेतील निवडणुका विचार घेऊन अजित पवार गटाने तालुक्यात ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे अशी चर्चा होत आहे. या निवडीबद्दल तालुक्यातून सूर्यवंशी व गंगणे यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात येत आहे.