बीआरएस पक्षाला बदनाम करण्यासाठी चुकीच्या माहितीच्या आधारावर विरोधी पक्षांनी रचलेले कट-मीडिया समन्वयक प्रशांत नवगिरे

बीआरएस पक्षाला बदनाम करण्यासाठी चुकीच्या माहितीच्या आधारावर विरोधी पक्षांनी रचलेले कट-मीडिया समन्वयक प्रशांत नवगिरे
तुळजापूर /न्यूज सिक्सर
भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव हे स्वतः व तेलंगणाचे कांही मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांचेसोबत पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत . त्यांच्यासाठी त्याठिकाणी फक्त आणि फक्त शुद्ध शाकाहारीच जेवणाची सोय करण्यात आली होती . स्थानिक पदाधिकारी व या कार्यक्रमाची तयारी करणारे जे कामगार होते त्यांच्यासाठी मांसाहारी जेवणाची सोय करण्यात आली होती . परंतु कांही वृतवाहिन्यांवर आज जे BRS पक्षाची बदनामी करणारे वृत्त प्रसारित केले गेले त्याबदल खुलासा …. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाबद्दल सर्व वारकर्यांच्या व सामान्यांच्या मनात जी पावित्र्याची भावना आहे तीच भावना स्वतः के . चंद्रशेखर राव आणि त्यांच्या सोबत पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या सर्वांच्या सुद्धा मनात आहे .
केवळ आणि केवळ बीआरएस पक्षाला बदनाम करण्यासाठी चुकीच्या माहितीच्या आधारावर विरोधी पक्षांनी रचलेले हे कट कारस्थान असुन जाणूनबुजून बदनामीकारक वृत पसरविले आहे . हे राजकिय षडयंत्र आहे .
या अशा कटकारस्थांनामुळे पक्षवाढीवर कांहीही परिणाम होणार नसुन बीआरएस पक्षाची महाराष्ट्रामध्ये सुरु असलेली घोडदौड यापुढे प्रचंड वेगाने सुरुच राहिल .
महाराष्ट्र राज्य मिडीया समन्वयक, बीआरएस पक्ष