नारायणराजे गवळी यांच्या स्मरणार्थ जारची पाणपोई

नारायणराजे गवळी यांच्या स्मरणार्थ जारची पाणपोई
तुळजापूर/न्यूज सिक्सर
कै. नारायणराजे गवळी यांच्या स्मरणार्थ थंडगार जार च्या पाण्याची पानपोई सुरू करण्यात आली. संपूर्ण उन्हाळ्यात दररोज १०० जार युवा उद्योजक शशी ज्योत यांच्या वतीने पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. थंडगार जार च्या पाण्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात नागरिकांची सोय होणार आहे.
नळदुर्ग रोड वर कै. नारायण राजे गवळी मित्र मंडळाच्या कार्यालया समोर सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन बाजार समिती चे माजी सभापती विजय गंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रकाश मगर, भारत सुर्यवंशी, सूरज साठे, मनोज गवळी, संतोष इंगळे, आश्विन घोरपडे, ओनील हांगरगेकर, शहाजी कावरे, सचिन काळे, सुशांत हत्तिकर, विवेक तांबे आदींची उपस्थिती होती. पाणपोई मुळे शालेय मुले, भाविक भक्तांना, ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना थंडगार पाण्याची सोय होणार आहे. पाणपोई चे या वर्षी ०४ थे वर्ष आहे.