ब्रेकिंगमहाराष्ट्र
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांच्या वतीने उस्मानाबाद शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी हायस्कुलचे मुख्याध्यापक पी.एन. पाटील, मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई लोमटे, किरणताई निंबाळकर, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर अनभुले, संजय पाटील, महेंद्र केसकर, अमोल दळवी, उत्रेश्वर सोन्ने, शिक्षक श्री. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात अविनाश रणखांब, सुरज सुरवसे, नितीन राऊत यांच्यासह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.