शिवसेनेकडून पिण्याच्या पाण्याचे मंगरूळ जिल्हा परिषद गटात केली टँकरची सोय …..
Post- गणेश खबोले

तुळजापूर-प्रतिनिधी
दि.१६ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून कुंभारी या गावी धाराशिव जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख अमरराजे कदम,यांच्या हस्ते शिवसेना उपतालुका प्रमुख श्री खंडू कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगरूळ जिल्हा परिषद या गटामध्ये मौजे कुंभारीत जूनच्या महिना अखेरपर्यंत संपूर्ण उन्हाळा मोफत पाण्याच्या टँकरचे लोकार्पण सोहळा करण्यात आला. यावेळी धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,शिवसेना उप तालुकाप्रमुख श्री खंडू कुंभार ,युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे,तुळजापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख संतोष दूधभाते, नळदुर्ग युवा सेना शहर प्रमुख अफजल कुरेशी , जेष्ठ शिवसैनिक बंडू कसेकर, मनोज भाई मिश्रा, प्रताप तांबे, उमेश तांबे, या गावचे उपसरपंच संतोष शिरसागर ग्रामपंचायत सदस्य दीपक वडणे, ग्रामपंचायत सदस्य खंडू रोकडे,गावातील सर्व ग्रामस्थ व शिवसैनिक पदाधिकारी यांच्या उपस्थित हा लोकार्पण सोहळा करण्यात आला.