न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रतिभा निकेतन विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रतिभा निकेतन विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मुरुम/न्यूज सिक्सर

प्रतिभा निकेतन विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नगर विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१६) रोजी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या महानंदा रोडगे होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरूळे, माजी उपसभापती गोविंद पाटील, विकासेसोचे चेअरमन दत्ता चटगे, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, माजी मुख्याध्यापक सागर, दिलीप पांचाळ, मल्लिनाथ भोसगे, सुर्यकांत जाधव, खंडु सक्करगी, हुळमुजगे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. करबसप्पा ब्याळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, विवेकानंद परसाळगे, प्रल्हाद सगर, चंद्रमप्पा कंटे, बालाजी बिदे, शिवशरण तांबडे, दिलीप हिप्परगे आदींनी पुढाकार घेतला. सुत्रसंचलन संतोष सुर्यवंशी तर आभार राधाकृष्ण कोंढारे यांनी मानले. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी बापूराव पाटील, महानंदा रोडगे, दत्ता चटगे, गोविंद पाटील, अशोक सपाटे व अन्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे