उत्सव नवरात्रीचा, महाराष्ट्राच्या आरोग्याचा ! महाआरोग्य शिबीरास दिली पालकमंत्र्यांनी भेट
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

उत्सव नवरात्रीचा, महाराष्ट्राच्या आरोग्याचा !
महाआरोग्य शिबीरास दिली पालकमंत्र्यांनी भेट
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथे सुरु असलेल्या ‘उत्सव नवरात्रीचा, महाराष्ट्राच्या आरोग्याचा’ या तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराला जिल्ह्याचे पालकमंत्रत्री तथा आरोग्यमंत्री डाॅ.तानाजी सावंतसाहेबांनी आज भेट दिली. महाआरोग्य शिबीर हा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आई तुळजाभवानीच्या नगरीत हे शिबीर संपन्न होत आहे. या महाआरोग्य शिबिरात नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या आणि त्यावरील उपचार मोफत करण्याची सुविधा देण्यात येत असून जनतेसाठी २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहेत.
सदर शिबिराची आज सविस्तर पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर वर्ग आणि धाराशिव जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शिबिराच्या दरम्यान नागरिकांना कोणताही अडचण येता कामा नये, जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी करावा अशा सूचना देत काही अडचणी असल्यास तत्काळ सोडविण्यात याव्यात असे निर्देश यावेळी दिले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मंत्रालय स्तरापासून सर्व अधिकारी-डॉक्टर वर्ग आपले योगदान देत असून या महाआरोग्य शिबिरामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा सेविका रुग्ण सेवा देत आहेत.
जास्तीत जास्त भाविक आणि नागरिकांनी या शिबिरात येऊन तपासण्या आणि उपचार करून घ्यावेत असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले. हे शिबीर आज आणि उद्या सुरु असून मी यानिमित्ताने तुम्हा सर्वांनाही आवाहन करतो कि या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.
यावेळी डाॅ.धर्मेंद्र कुमार,धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,जिल्हाप्रमुख सुरज महाराज साळुंके,मोहन पनुरे,अनिल खोचरे,उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे,तालुकाप्रमुख संभाजी पलंगे,उपतालुकाप्रमुख खंडू कुंभार,विपीन खोपडे,मारूती बनसोडे,मनोज मिश्रा हजर होते.