न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

भाजपाच्या अर्चना अंबुरे यांचा BRS मध्ये प्रवेश

भाजपाच्या अर्चना अंबुरे यांचा BRS मध्ये प्रवेश

जळकोट/न्यूज सिक्सर

भाजपा महिला मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे यांनी काल दि. १३ जुन रोजी हैदाबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव यांच्या हस्ते भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला .
अंबुरे यांनी या अगोदर जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती त्यानंतर त्यांनी भाजपा महिला मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष पदावर यशस्वीपणे कार्य केले .
या पदावर कार्यरत असताना त्यांनी विविध सामाजिक व विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव यांनी केलेला तेलंगणाचा सर्वांगिण विकास व त्यांच्याकडे असलेली विकासाची दूरदृष्टी तसेच त्यांची कन्या , भारत राष्ट्र समिती च्या नेत्या के . कविता यांनी मागील दोन महिन्यांपूर्वीच महिला दिनाचे औचित्य साधुन, दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर महिला आरक्षण विधेयकासाठी दोन दिवसीय आक्रमक असे आंदोलन केले होते . महिलांच्या राजकिय हक्कांसाठी लढणारी एकमेव महिला म्हणून के . कविता यांच्या कार्यावर प्रेरित होवुन भारत राष्ट्र समिती या पक्षा rत प्रवेश केला असुन आपण सपूर्ण महाराष्ट्रात हा पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अर्चना अंबुरे यांनी सांगितले .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे