भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या उपस्थितीत भव्य धाराशिव जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी कुस्ती स्पर्धा २०२५ संपन्न
Posत-गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील वाकडी येथे अरविंदबप्पा रगडे युवा मंच आणि वाकडी येथील राजमुद्रा युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने धाराशिव जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या चाचणी कुस्ती स्पर्धेच्या वेळी भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी उपस्थित राहुन कल्याणसागर समुहाच्या वतीने परंडा तालुक्यातील मल्ल 2025 चा “महाराष्ट्र केसरी” झाल्यास त्यास एक लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. अरविंद (बप्पा) रगडे यांनी आयोजित केलेल्या धाराशिव जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी या कुस्ती स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातून विविध भागातील अनेक मल्लांनी सहभाग घेतला. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, भूमचे माजी नगराध्यक्ष संजयनाना गाढवे, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) विधानसभा प्रमुख नवनाथ आप्पा जगताप, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सरचिटणीस धनाजी गायकवाड, भूम ता.सरचिटणीस संतोष सुपेकर, जयंत सायकर, किरण कवटे या स्पर्धेचे आयोजक तथा भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद बप्पा रगडे, डबल उप महाराष्ट्र केसरी पै. बाळासाहेब पडघन, पै. विशाल देवकर, श्रीराम गोडगे, कुस्ती निवेदक राजाभाऊ देवकते बालाजी बुरुंगे भारत डाकवाले माऊली गोडगे व वाकडी ग्रामस्थ उपस्थित होते.