ब्रेकिंग
गोवंश जणावरांची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

गोवंश जणावरांची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
परंडा/न्यूज सिक्सर
अकलुज नाका इंदापूर येथील- अरफात असिफ कुरेशी, अखिल शकील कुरैशी, तर सोमवार गल्ली परंडा येथील- कलीम आत्ताउरहेमान मुजावर यांनी दि 02.06.2023 रोजी 18.30 वा. सु. परंडा ते कुर्डुवाडी जाणारे रोडलगत परंडा येथे सत्तर बाजूस विटाने बांधलेल्या व पत्रे लावलेल्या इलेक्ट्रीक बल्बच्या उजेडात गोवंश जनावरे कापून त्याचे कातडे सोलत असताना वाहतुक शाखाचे पोलीस उप निरीक्षक श्री. राजेंद्रसिंग ठाकुर यांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5(क), 9, 9(अ) अंतर्गत परंडा पोठा येथे गुन्हा नोंदवला आहे.