स्वराज्य संघटना आक्रमक,साठवण तलावातील पवनचक्कीचे विद्युत पोल काढण्याची मागणी
Post-गणेश खबोले

लोहारा प्रतिनिधी
स्वराज्य संघटना व शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील साठवण तलावात सिमेंश गमेशा व टोरंट या पवनचक्की कंपनीने साठवण तलावाच्या सांडव्यात व इतर ठिकाणी अतिउच्च दाबाचे विद्युत पोल रवल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत हिप्परगा (रवा) येथील शेतकरी यांनी उपविभागीय पाटबंधारे विभाग शाखा क्रमांक आठ यांना वेळोवेळी निवेदने तक्रारी अर्ज देऊन देखील पाटबंधारे विभागाने देखील दखल न घेतल्यामुळे स्वराज्य संघटना यांच्या माध्यमातून निवेदन देऊन दिनांक १५ मे रोजी हिप्परगा येथील साठवण तलावात जलसमाधी आंदोलन केले.याबाबत लवकर पाऊल उचलले नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे महेश गोरे यांनी सांगितले.
याप्रसंगी स्वराज्य संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे, गंगाराम भोंडवे, ओमकार चौगुले, बालाजी मुळे, शिवाजी पवार, नितीन मुळे राजाभाऊ मुळे, तानाजी जाधव,तुषार जाधव, आदी उपस्थित होते.