महिला वस्तीगृह अधीक्षकांना धमकावण्याचा प्रयत्न अधिष्ठाता गंगासागरे यांच्यासह मेस चालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

महिला वस्तीगृह अधीक्षकांना धमकावण्याचा प्रयत्न
अधिष्ठाता गंगासागरे यांच्यासह मेस चालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
धाराशिव /न्यूज सिक्सर
धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या महिला वस्तीगृहाच्या अधीक्षक या महिला असून त्यांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या प्रोत्सानामुळे चालक सुनीता पाटील व तिचा पती रविराज पाटील व मुलगा तसेच इतरांकडून रात्री अपरात्री धमकावण्याचे व सतत मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याप्रकरणी समिती नेमून अधिष्ठाता यांच्यासह मेस चालक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिला वस्तीगृहाच्या अधीक्षिका एस.एस. भोसले यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे दि.१७ एप्रिल रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामधील मेस चालविण्यासाठी सुनिता रविराज पाटील यांना दिली आहे. सुनिता पाटील या महिला वस्तीगृहाच्या अधीक्षिका भोसले यांना वरिष्ठांच्या प्रोत्साहनामुळे वारंवार अर्वाची शिवीगाळ जातिवाचक उद्देशून अपमान करणे, विद्यार्थ्यांनी समोर सतत तु खालच्या जातीची आहेस, अरे तुरे बोलून गुंड लोकांच्या धमक्या देते. तसेच माझे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, माझे वरपर्यंत वशिले आहेत. तर तिचे पती रविराज हे व्हिडिओ चित्रीकरण करतात. तसेच ते मुलींच्या कार्यालय, वेटिंग रूममध्ये येऊन दंगा करतात, मोठमोठ्याने बोलतात मोबाईलवर गाणे लावतात, अभ्यास करण्यास हॉलमध्ये विद्यार्थिनींना बसू देत नाहीत, दंगा करून मानसिक त्रास देत असल्यामुळे याचा विद्यार्थिनीच्या अभ्यासावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनी व भोसले यांना सतत मानसिक त्रास दिला जात आहे. जिमखाना व अभ्यास स्टडी रूमला लॉक लावले जाते.
रविराज पाटील व त्याचा मुलगा वस्तीगृहामध्ये मुक्काम करतात. जेवण चांगले न दिल्यामुळे वारंवार अस्वच्छ जेवणामुळे विद्यार्थिनी सतत आजारी पडत आहेत. तर अचानक सलग २-३ दिवस मेसला सुट्टी देऊन जादा पैसे वसूल करतात. विशेष म्हणजे वस्तीगृहातील मुलींनी बाहेर मेस लावल्यास त्यांना पाटील पती-पत्नी दोघेही धमक्या देतात. अधिष्ठाताकडे मुद्दाम ठराविक विद्यार्थिनींची सतत तक्रार करून मानसिक त्रास व छळ करीत आहेत. भोसले यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत उलट त्यांच्यावरच जीवघेंना हल्ला करून जिवे मारण्याची धमकी देत आहेत. असाच प्रकार दि.२१ मार्च २०२३ रोजी रात्री ९.१५ वाजल्यानंतर विद्यार्थिनींच्या उघडण्यास भाग पाडून विनापरवाना प्रवेश करून मुलींना धमक्या देऊन दहशत निर्माण केली. तर एक्वागार्डचे पिण्याचे पाणी कळशीने भरून घेऊन जात असल्यामुळे विद्यार्थिनींना पिण्याचे पाणी कमी पडत आहे. याबाबत अधिष्ठाता यांना सांगितले असता तेही कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. तर या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पाटील यांनी बंद पाडून नादुरुस्त केलेले आहेत. त्यामुळे यांच्यापासून अधीक्षक भोसले व मुलींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या अन्याय अत्याचारापासून त्यांचे संरक्षण करून मेस चालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच संबंधित अत्याचारित व्यक्तींना न्याय द्यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी दिला आहे.