काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले जवाब दो मोदी आंदोलन

काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले जवाब दो मोदी आंदोलन
धाराशिव/न्यूज सिक्सर
भाजपचे वरिष्ठ नेते, जम्मू काश्मीर चे माजी राज्यपाल श्री.सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व 300 कोटीच्या ऑफर चा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. याची सखोल चौकशी करावी व खालील प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने उत्तर द्यावे असे म्हणत जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जवाब दो मोदी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खालील प्रश्न उपस्थित करण्यात आले..
1) पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गप्प राहण्यास का सांगण्यात आले?
2) भारतीय जवानांना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली?
3) पुलवामा घटनेत वापरण्यात आलेले 300 किलो RDX कुठून आले?
4) गुप्तचर यंत्रणांनी वारंवार दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष का केले गेले?
5) सत्यपाल मलिक यांना RSS चे महासचिव राम माधव यांनी 300 कोटींची ऑफर दिली, यावर कारवाई होणार की नाही?
या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, वरीष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, कोषाध्यक्ष अशोक बापू शेळके, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, महिला प्रदेश सरचिटणीस शिला उंबरे, जिल्हाध्यक्ष संगीता कडगंजे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष बालाजी बिदे, मूहिब शेख, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद सपकाळ, सरफराज काझी, सुनील बडुरकर, प्रणित डिकले, सलमान शेख, जमील सय्यद, अनंत घोगरे, इरफान कुरेशी, अभिषेक गुजर, अहमद चाऊस, सौरभ गायकवाड, इम्रान हुसेन्नी, महादेव पेठे, संतोष पेठे, खय्युम सय्यद आदी सहभागी झाले होते.