सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; आपसिंगा सात किमी डांबरी करण रस्ता रात्रीच्या वेळी खेळ चाले
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; आपसिंगा सात किमी डांबरी करण रस्ता रात्रीच्या वेळी खेळ चाले
तुळजापूर – आपसिंगा सात किमी रस्ता बांधकाम विभागाच्या अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने होत आहे !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा परिसरातील रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गुण नियंत्रण
पथकाचा अहवाल दडपुन वापरण्यात येणारा दगड व खडी निकृष्ट असल्यामुळे नवा डांबरी करण रस्ता किती काळ टिकेल याची खात्री
नाही. बांधकाम अधिकाऱ्यांनी हे काम चांगल्या दर्जाचे चालू आहे गावातील नागरिकांना विचारा म्हणत जबाबदारी झटकली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व टेकेदारच्या संगनमताने हे काम सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळुंके छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष केला आहे.
त्यासाठी क्या कामासाठी अंदाजे रक्कम २ कोटी ते 3 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. एवढा अमाप निधी प्राप्त होऊनही रस्त्याच्या कामाचा दर्जासुधारलेला नाही.डांबराचा अभाव असल्यामुळे खडी
आताच उचकुटू लागली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा तयार होणारा रस्ता खड्यात जाणारा आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामाची चौकशी करून योग्य काम करण्याचे आदेश काढण्यात येते
कामाच्या ठिकाणी अधिकारी भेटी देत नसल्यामुळे सुरू असलेल्या कामात डांबराचा वापर अत्यंत कमी आहे. व साईट पंख्याना मातीचा भराव करत आहे. त्या कामात कुठलाही नियम पाळला जात नाही उलट अधिकारी ठेकेदारांची पाठराखण करत काम व्यवस्थित सुरू असल्याचे सांगतात. म्हणुन पुन्हा कोट्यवधी रुपयांचा चुराडा होण्याची शक्यता आहे.येत्या आठ दिवसात कामाची चौकशी करून चांगल्या दर्जाचे काम करण्यात आदेश देण्यात यावे अन्यथा उप अभियंता , कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करून निलंबित करण्यात यावे
छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र साळुंके
तुळजापूर ते अपसिंगा सात किलोमीटर असलेला डांबरीकरणरस्ता अत्यंत चांगल्या दर्जाचा काम चालू आहे आणि त्या कामा ठिकाणी मी स्वतः हजर राहून कामाचे पाहणी करीत असतो त्यामुळे निकृष्ठ होण्याचे कामच नाही जरी होत असेल तरी चांगल्या प्रकाराचे काम करून घेण्याचे प्रयत्न करीन
शिवगंडे अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर