जुगार विरोधी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब यांची कारवाई

जुगार विरोधी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब यांची कारवाई
कळंब /न्यूज सिक्सर
उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब चे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी दि. 10.04.2023 रोजी ढोकी पोलास ठाणे हद्दीत गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, जागजी जाणारे रोडलगत असलेल्या हॉटेल राहुलच्या पाठीमागे काही इसम जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी 20.00 वा. सु. छापा टाकला असता तेथे जागजी, ता. धाराशिव येथील रहिवाशी – 1.अनिल सावंत, 2.विलास बळराम आडे, 3.सचिन काटे 4.अशोक सावंत, 5.राघु सावंत, 6. युवराज सावंत हे सर्व लोक तिरट मटका जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह रोख रक्कम व 6 मोटरसायकल असा एकुण 3, 81, 200 ₹ चा माल बाळगलेले असताना पथकास आढळले. यावर पथकाने जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे ए.एस.पी.- श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. पुजरवाड, पोलीस अंमलदार- भांगे, खांडेकर अंभोरे यांच्या पथकाने केली आहे.