मोर्डा येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
मोर्डा येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

मोर्डा येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
तुळजापूर दि 11 : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथे दि.११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती सीताबाई उत्तम सुरवसे आणि उत्तम सुरवसे या दांपत्याच्या नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी केली.दोन एकर क्षेत्रावरील असलेल्या द्राक्ष बागायत दि.८ एप्रिलच्या वादळ पावसाने भुईसपाट झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांपत्याची विचारपूस केली व त्यांना धीर दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री तानाजी सावंत आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी खासदार रवींद्र गायकवाड, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, शिवसेनेचे नेते अनिल खोचरे, तालुकाप्रमुख संभाजी पलंगे, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
द्राक्ष बागायतदार शेतकरी यांना कर्जाविषयी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली .सुरवसे दांपत्याची विचारपूस केली,त्यांना धीर दिला. कोणकोणत्या बँकेचे कर्ज आहेत याची विचारपूस केली. पूर्णपणे उध्वस्त झालेल्या द्राक्ष बागेत रस्ता काढत बागेमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या बरोबर धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री महोदयांना जिल्ह्याच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी या प्रसंगी अनेक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी पुढे घेतले आणलेल्या नुकसान झालेल्या पिकाचे नमुने याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पाहिले.
पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार शेतकऱ्याचे सरकार आहे मुख्यमंत्री शेतकऱ्याचा मुलगा आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्री स्वतः शेतामध्ये येऊन पाहणी करतो आहे आपण घरामध्ये बसून किंवा मंत्रालयामध्ये बसून निर्णय घेणारे मुख्यमंत्री नाही आहोत असा चिमटा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काढला.
या भागात हातात तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे पिकाचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे या संदर्भात आपण विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि संबंधित आमदार यांना योग्य निर्देश यापूर्वी दिले आहेत युद्ध पातळीवर पंचनामे होत आहेत नुकसान झालेल्या शेतकऱ्याला निश्चित मदत मिळेल असा विश्वास त्यांनी दिला एन डी आर एफ नियम बदलून आपण सतत पडणाऱ्या पावसाला आपत्ती घोषित केले आहे यापूर्वी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत शंभर टक्के शेतकऱ्याला मदत मिळेल असे सांगून घरामध्ये बसून आपण निर्णय घेत नसल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका चुकीची आहे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले
आयोध्या मध्ये रामाचे दर्शन घेतले तेव्हा आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सुखी ठेव, शेतकऱ्यांवर आलेले अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट दूर करण्याचे साकडे प्रभू श्री राम चरणी घातल्याचे सांगून ज्यांनी रथयात्रा अडवली त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणे केली आहे हे शंभर टक्के राजकारण आहे बाळासाहेब ठाकरे यांची 20% राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हे देखील उद्धव ठाकरे विसरले आहेत असा टोमणा त्यांनी याप्रसंगी मारला
फोटो –
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मोरयाच्या शेतकरी सरस्वती सुरवसे पालकमंत्री तानाजीराव सावंत, आमदार राणा जगजीत सिंह पाटील छायाचित्रांमध्ये दिसत आहेत