डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी अध्यक्षपदी विनोद लोखंडे यांची एकमताने निवड

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी अध्यक्षपदी विनोद लोखंडे यांची एकमताने निवड
जळकोट/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी सनदी आधिकारी प्रकाश लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली असून या बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी जळकोटच्या अध्यक्षपदी सर्वानुमत्ते विनोद भगवान लोखंडे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणुन प्ररमेश्वर लोखंडे यांची निवड करण्यात आली तसेच सचिव स्वदेश लोखंडे,कोष अध्यक्ष गजानन लोखंडे,सहकोष अध्यक्ष प्रदिप लोखंडे आदींची निवड करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष हरिभाऊ लोखंडे यांच्या हस्ते नविन कार्य करणीचा सत्कार करण्यात आला.यावर्षी १४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर,माता जिजाऊ रमाई,भिमाई,अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यानाचा कार्यकम व सांस्कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष विनोद लोखंडे यानी या प्रसंगी बोलताना दिली
यावेळी पत्रकार अरुण लोखंडे,अरविंद लोखंडे, सुनिल माने,ग्रा. प.सदस्य अंकूश लोखंडे,सतिश माने युवराज लोखंडे,रमेश लोखंडे,दामोदर लोखंडे,पाडूरंग,लोखंडे,अभिमन्यू लोखंडे,मुकूंद लोखंडे ,जगदीश लोखंडे, राजेश लोखंडे,विठल लोखंडे पाडूरंग साखरे,अशितोष भालेराव,सागर लोखंडे, सतिश गायकवाड,संतोष सोनकांबळे,किरण सोनकांबळे,महादेव भालेराव,अक्षय लोखंडे,सुरेश लोखंडे,गौतम लोखंडे,योगेश लोखंडे,सामाजीक कार्यकर्ते नवनाथ लोखंडे,(डोंबेवली),विलास लोखंडे (खोपोली) सह भिमनगर मधील बौद्ध उपासक उपासिका युगपुरुष तरुण मंडळाचे सर्व पदाधिकार भिमसैनिक मोठया संख्येने य उपस्थित होते,