
खुदावाडी ( सतीश राठोड )
पाणी हे जीवन असून पाण्याचा वापर जनतेने गरजेपुरता व काटकसरीने करून पाण्याचे संवर्धन व जतन करणे काळाची गरज आहे अशी प्रतिक्रिया भूजल शास्त्र विभाग वालचंद महाविद्यालय सोलापूरचे डॉक्टर माळी यांनी बोलताना केले
धाराशिव जिल्ह्यातील खुदावाडी तालुका तुळजापूर येथे जागतिक जल दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील शेतकरी बांधव व जल अभियान समिती खुदावाडी यांच्यावतीने भूगर्भातील पाणी काल आज व उद्या या विषयावर व्याख्यान संवाद शंका निरसन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर माळी बोलत होते .प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . आयोजित कार्यक्रमात घरावरील छतावर पावसाळ्यात पावसाचा पडणारा थेंबना थेंब पाणी घराजवळच स्वेच्छ खड्ड्या करून प्रत्येक कुटुंबाने पाणी जमिनीत गाडा असे आवाहन करण्यात आले . यावेळी आणदुर ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर जितेंद्र कानडे , भाजपा आणदुर शहराध्यक्ष दीपक घोडके , माजी आरोग्य अधिकारी अशोक चिंचोले यांची प्रमुख उपस्थिती होती .
याप्रसंगी समाजसेवक डॉक्टर सिद्रामप्पा खजुरे , तंटामुक्त अध्यक्ष वसंत कबाडे , माजी पसं सदस्य महादेव सालगे , सेवानिवृत्त सहशिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते महादेव चिंचोले सह ग्रामस्थ महिला शेतकरी वर्ग उपस्थित होते .