
लोहारा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथे विद्यार्थी स्वंयशासन दिनाची सुरूवात शहिद भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांना अभिवादन करून करण्यात आली.स्वंयशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे अभिरूप मुख्याध्यापक म्हणून श्रद्धा भोंडवे हिने काम पाहिले तर अभिरूप शिक्षक म्हणून पल्लवी गरगडे,नरसिंग भोंडवे, अथर्व मत्ते यांनी काम पाहिले. यावेळी अभिरूप शिक्षकांनी वर्षभर आपल्या शिक्षकांचे केलेले निरीक्षण या दिवशी कामी आल्याचे दिसले. यात मुलांना सुचना देण्याची पद्धत,शिकवण्याची कला अभिरूप शिक्षकांच्या अंगी दिसून आली.यावेळी पहिली वर्ग शिक्षक म्हणून अथर्व मत्ते, दुसरी वर्ग शिक्षक नरसिंग भोंडवे,तिसरी वर्ग शिक्षक म्हणून पल्लवी गरगडे व श्रद्धा भोंडवे यांनी काम पाहीले.आजच्या एका दिवसाच्या शिक्षकांनी दिवसभर सुंदर कामकाज केले.यावेळी विद्यार्थ्यांना कविता गायन, शब्दलेखन, पुस्तक वाचन, अनु लेखन, जोडाक्षरे लेखन, गणिती क्रिया, इंग्रजी शब्द लेखन,अंक वाचन, पाढे,लेखन सराव घेण्यात आला.शाळेतील शिक्षिका उषा बर्डे यांच्यातर्फे चौथी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्ष पॅड चे वाटप केले. तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भारतीय संविधान स्विकारतानाचा फोटो भेट दिला.यावेळी अभिरूप शिक्षक, मुख्याध्यापकांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके,सहशिक्षीका उषा बर्डे,आरोग्यसेवक एस.आर.जवादे, अंगणवाडी शिक्षीका कालींदा मत्ते,गुंडूताई मोहीते,शालेय पोषण आहार कर्मचारी हमीद मुजावर, रईसा मुजावर, विद्यार्थी उपस्थित होते.