आमदार अभिमन्यू पवार यांची ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरला सदिच्छा भेट..
Post - गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील ग्रामीण रुग्णालय स्पर्शला सदिच्छा भेट दिली व जवळपास 2 तास ग्रामीण रुग्णालय स्पर्शच्या कामकाजाची आस्थेवाईक पणे सखोल पाहणी केली. ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तुरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी आमदारांना स्पर्शच्या दैनंदिन कामकाजाची माहिती दिली. ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरचे कामकाज येथील स्वच्छता, कर्मचार्याची रुग्णांना दिली जाणारी वागणूक व येथील शिस्त पाहून आ.अभिमन्यू पवार खूपच प्रभावीत झाले ते आपल्या मनोगत व अभिप्रायमध्ये म्हणाले कि, स्पर्शची ख्याती सर्वदूर पसरली आहे. स्पर्शच्या आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल नेहमीच ऐकले आहे. आज प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला. स्पर्श मार्फत दिल्या जाणार्या दर्जेदार आरोग्य सेवेमुळे ग्रामीण भागातील जनतेसाठी त्यांच्या आरोग्याच्या निवारणासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यामधून आरोग्य सेवेसाठी येणाऱ्या रुग्णांच्या प्रचंड प्रमाणातील ओढ्यावरूनच हे सिद्ध होते असे ते म्हणाले. आपल्या भावना व्यक्त करताना पुढे ते म्हणाले कि, संपुर्ण समर्पण वृत्तीतूनच स्पर्शने आपले इतरांनपेक्षा वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यामुळेच या रुग्णालयाला शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय दर्जा गुणवत्ता मानांकन (NQAS) पुरस्कार प्राप्त लक्ष्य पुरस्कार, आरोग्य सेवेचा महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमानकाचा दोने वेळा पुरस्कार, स्वच्छ भारत अभियानच्या कायाकल्पचा राज्य स्तरीय पुरस्कार तसेच कायाकल्प अभियानाचे दर वर्षी उतेजनार्थ परितोषिक प्राप्त करणारे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव ग्रामीण रुग्णालय असावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या सर्वच गामिन रुग्णालयांनी स्पर्शचा आदर्श घेऊन आपल्या परिसरातील गोरगरीबांना आदर्श आरोग्य सेवा द्यावी असे आबाहन त्यांनी उपस्थितांना केले. “गेल्या काही वर्षपासून ‘स्पर्श’ बद्दल एकूण होतो आज पाहण्याचा योग आला. शासकीय स्तरावरचे असे रुग्णालय पाहण्याचा आणि अनुभवण्याचा पहिल्यांदाच योग आला. संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य सेवा कशि असावी हे स्पर्श पाहिल्यानंतर एक आशेचा किरण तयार होतो. आणि आशा प्रकरची व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली तर महाराष्ट्रातील आरोग्य एकूणच महाराष्ट्रातील गोर-गरिब जनतेला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. अशा प्रकारची PPT Model आणि समर्पनुक्त करणारे कर्मचारी असले पाहिजेत. या रुग्णालयाची स्वच्छता, व्यवस्थापन, रुग्णाची काळजी घेणे एकूणच रानिमान, आदरर्तीर्थ, पेशंटच्या नातेवाईकाना विचारणा केली. रुग्णालयात गेल्या नंतर एक आगळा वेगळा अनुभव आला शहरात हि चांगल्या रुग्णालयामध्ये हे रुग्णालय गणले जाईल. स्पर्शची संपुर्ण टीम अतिशय समर्पित भावनेने काम करत सर्व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. पुढील वाटचाली साठी माझ्या शुभेच्छा”. यावेळी रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.