
लोहारा-प्रतिनिधी
पोलीस स्टेशन लोहारा हद्दीतील दुरक्षेत्र सास्तुर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक अजित कुमार चिंतले यांच्या मार्गदर्शनाखाली दुरक्षेत्र सास्तूर येथील परिसरात आंबा,आवळा,सैतुक,बांबू व इतर 100 ते 150 प्रकाराच्या झाडाची लागवड करण्यात आली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे,पोलीस हवालदार विठ्ठल धवन,महिला पोलीस हवालदार बेबी सरोजा काजळे,पोलीस नाईक रामप्रसाद सांगवे,पोलीस कॉन्स्टेबल सुनील मोरे,लक्ष्मण भोपळे,साखरे,माधव कोळी यांच्यासह पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते
.