देवानंद रोचकरी तुळजापुरातून विधानसभेसाठी इच्छुक;गावभेटीवाढल्या तुळजापूर तालुक्यात देवानंद रोचकरी यांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे विधानसभेसाठी विरोधकांना रोचकरी यांनी दंड थोपटले आहेत
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

देवानंद रोचकरी तुळजापुरातून विधानसभेसाठी इच्छुक;गावभेटीवाढल्या
तुळजापूर तालुक्यात देवानंद रोचकरी यांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे
विधानसभेसाठी विरोधकांना रोचकरी यांनी दंड थोपटले आहेत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून देवानंद रोचकरी यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी तुळजापूर तालुक्यातील मतदारसंघातून केली जात आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात देवराज मित्र मंडळची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून गाव तिथे शाखा काढून संघटन निर्माण केले आहे शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब तरुणांना न्याय देण्याचे काम
देवराज मित्र मंडळ हे बऱ्याच वर्षापासून करीत आहे
देवराज मित्र मंडळ यांच्या समूहाच्या माध्यमातून सर्वच घटकांना सहकार्य करण्याचे काम देवानंद रोचकरी यांनी केले आहे यांचे कार्य तुळजापूर तालुक्यासाठी महत्त्वाचे राहिल्याने त्यांनी तुळजापूर विधानसभा लढवावी, अशी मागणी देवराज मित्र मंडळ व तुळजापूर तालुक्यातील मतदारसंघातून होत आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून मतदार राजातून व कार्यकर्त्यातून मागणी होत आहे.देवराज मित्र मंडळाचे चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी चे उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष देवानंद रोजकरी हे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. संपूर्ण तुळजापूर मतदारसंघ कृष्णा रोचकरी तसेच गणेश दादा रोजकरी ,देवानंद रोजकरी यांनी पिंजून काढत आहेत.