तुळजापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविने व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसराचे शुशोभिकरण करण्याचे काम सुरू – रिपाइंचे तानाजी कदम यांनी केली पहाणी

तुळजापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविने व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसराचे शुशोभिकरण करण्याचे काम सुरू – रिपाइंचे तानाजी कदम यांनी केली पहाणी
तुळजापूर /न्यूज सिक्सर
धाराशिव जिल्ह्यातील
तुळजापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसराचे शुशोभिकरण करण्याच्या कामाला तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने टेंडर काढून सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रिपाइं (आठवले)सह तमाम आंबेडकरी अनुयायांच्या वतीने तुळजापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचा पुर्णाकृती पुतळा बसवून चौकाचे शुशोभिकरण करण्यात यावे असी मागणी होती. या मागणीला अखेर शासनाने सर्वोतोपरी मंजुरी दिली असून तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने टेंडर काढून सदर कामाला दोन तीन महिण्यापासून सुरुवात करण्यात आली आहे.नुकतच रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) चे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांनी या कामाची पहाणी केली असून सदर काम अत्यंत संत गतीने होत असल्याची खंत व्यक्त करून या कामात नगरपरिषदेने लक्ष देऊन हे काम जलद गतीने व चांगल्या दर्जाचे करावे असी मागणी केली आहे.यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, भिमराव सोनवणे,रवींद्र वाघमारे, उपस्थित होते.