अणदूर येथे श्रीराम चौक फलकाचे उदघाट्न

अणदूर येथे श्रीराम चौक फलकाचे उदघाट्न
अणदूर /न्यूज सिक्सर
श्रीराम नवमीचे औचित्य साधून ,जय श्रीराम सांस्कृतिक महोत्सव मंडळा तर्फे फलक उदघाट्न कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होत्या, महास्वामीजी यांच्या शुभहस्ते फलकाचे अनावरन संपन्न झाले, स्वामीजी यांनी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले या मध्ये ,व्यसनमुक्ती ,डॉल्बी मुक्त मिरवणूक ,जाती-पाती सोडून मानवता हाच खरा धर्म आहे, आणि आपण त्या धर्माचे पाईक आहोत असे मनोगत त्यांनी व्यक्त केले, त्यानंतर पत्रकार अजय अणदूरकर , प्रा.सूर्यकांत आगलावे सर व प्रवीण गुरव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले , आभार योगेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक कॉलनी मधील महिला, युवक व जेष्ठ लोक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले.