तुळजापूर विधानसभा मतदार संघात मतदारांना हवा उच्च शिक्षित, क्रियाशील उमेदवार ! वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. स्नेहाताई सोनकाटे
ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

तुळजापूर विधानसभा मतदार संघात मतदारांना हवा उच्च शिक्षित, क्रियाशील उमेदवार !
वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. स्नेहाताई सोनकाटे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांच्याकडून जोरदार आव्हान मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप घोषित झालेला नसला, तरी डॉ. सोनकाटे यांनी प्रचाराच्या आघाडीवर सक्रियता दाखवत संपूर्ण मतदारसंघात जनसंपर्क साधला आहे.
सिंदगावच्या रहिवासी असलेल्या डॉ. स्नेहाताई सोनकाटे या धनगर समाजाच्या असून, त्यांनी ओबीसी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुणे आणि मुंबई येथे काम केले आहे. मतदारसंघात धनगर आणि ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने या निवडणुकीत डॉ. सोनकाटे यांचा प्रभाव लक्षात घेता, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांच्या गावभेटी दरम्यान, ओबीसी समाजाने त्यांना आमदार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी चर्चा तुळजापूर मतदारसंघातून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे तुळजापूर मतदारसंघातील निवडणूक लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.डॉ. स्नेहाताई सोनकाटे या उच्चशिक्षित असून, सर्वसामान्य घराण्यातील आहेत. आपला माणूस, आपली उमेदवार म्हणून त्यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.