श्री.तुळजाभवानी मंदिरात देविला प्राचीन परंपरेनुसार रंगपंचमी खेळण्यात आली .

श्री.तुळजाभवानी मंदिरात देविला प्राचीन परंपरेनुसार रंगपंचमी खेळण्यात आली .
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तिर्थ क्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात रंगपंचमीचा सण रविवार दि.१२ मार्च २०२३ रोजी पारंपारिक पध्दतीने रंग खेळुन साजरा करण्यात आला
सकाळी श्री तुळजाभवानी देवीजीस दही दुधाचापंचामृत अभिषेकपुजा झाल्यानंतर देवीजींच्या अंगावर पांढरे शुभ्र वस्ञोलंकार घालण्यात आले होते यावेळो देवीचे मुख्य
महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी ,भोपे पुजारी व पुजारी वर्ग आदि उपस्थित होते.श्री देवीची रंगपंचमी झाल्यावर देवीच्या अंगावर लाल गुलाबी सह सात रंग हाताने टाकण्यात आल्यानंतर रंगपंचमी खेळण्यास आरंभ झाला रंगपंचमी पार्श्वभूमीवर मंदीर परिसर वगळता व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवुन रंग खेळल्याने शहरातील बहुंताशी बाजार पेठ बंद होती.
सकाळी बच्चे कंपनी रंग खेळ्यास सुरुवात केल्यानंतर दुपारी मोठ्या मंडळीनी रंग खेळण्यास आरंभ झाला जसजसे ऊन्ह वाढत जात होते तसे तसे रंगपंचमी खेळण्यास उधान आले रंग खेळण्याचा सिलसिला सांयकाळ पर्यत सुरु होता.