लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामाफर्त थेटकर्ज योजना सुरु

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास
महामंडळामाफर्त थेटकर्ज योजना सुरु
उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
सन 2022-23 या वित्तीय वर्षात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेटकर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार उसमानाबाद जिल्हयासाठी एकूण50 लाभार्थीचे रक्कम रु.50.00 लाखाचे उदिदष्ट प्राप्त झाले होते.
मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील लोकांना दि.20 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत अर्ज वितरण व स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात आली होती.
अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष्, लाभार्थी निवड समिती,शिवाजी शिंदे यांचे दालनात दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी लाभार्थी निवड समितीची बैठक संपन्न झाली यांमध्ये महामंडळाच्या परिपत्रकानुसार व नियमानुसार कागदपत्रांची पुर्तता केलेल्या,सिबील स्कोअर 500 च्या वर असलेल्या,तसेच महामंडळाच्या योजनेचा यापुर्वी लाभ न घेतलेल्या अर्जदारांना पुढील प्रकियेसाठी पात्र करण्यात आले आहे.यामध्ये पुरुष 161 व स्त्रि 44 असे एकूण 205 कर्ज चिटृी प्रक्रियेसाठी मंजूर झाले हाते.
शासन निर्णय सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य,क्रिडा व विशेष सहाय्य विभाग,क्रमांक मकवा-2012/प्र.क्र.149/महामंडळ,दि.14 मे,2012 अन्वये शासनाने महामंडळाच्या लाभार्थीच्या निवडीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थीची निवड ही चिटटी पध्दतीने करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून दि.28 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता स्थळ-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जवळ,उस्मानाबाद.येथे कार्यक्रमासाठी खालील प्रमाणे मान्यवर उपस्थित होते.
निवासी उपजिलहाधिकारी, तथा अध्यक्ष लाभार्थी निवड समिती,शिवकुमार स्वामी यांचे प्रतिनिधी म्हणून एस.एन.भिसे (तहसिलदार),तहसिल कार्यालय,उसमानाबाद.व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,उसमानाबाद यांचे प्रतिनिधी म्हणून युवराज भोसले (निरीक्षक),समाजकल्याण उस्मानाबाद एल.ए.क्षीरसागर,जिल्हा व्यावस्थापक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) उस्मानाबाद सदस्य सचिव व अर्जदार व सामाजिक कार्यक्रर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात एल.ए.क्षीरसागर, जिल्हा व्यावस्थापक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.)उस्मानाबाद यांचे प्रस्ताविक भाषणाने झाली असून यामध्ये महामंडळाच्या थेटकर्ज योजना संदर्भात सविस्तर माहिती कार्यकमा दरम्यान दिली आहे.या कार्यक्रमामध्ये मातंग समाजातील सर्व महिला व पुरुष अर्जदार,सामाजिक कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.लाभार्थी निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक झाल्यामुळे सर्व उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
या कार्यक्रमाचं सुत्र संचालन हनुमंत वायदंडे,उस्मानाबाद यांनी केले असून कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य विजय कसबे,ङि एस.कसबे, व पी.डि,झेंबाडे, उस्मानाबाद यांनी केले आहे.तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमातीचे जिल्हा व्यावस्थापक,पी.एम.झेंबाडे, हे ही उपस्थित होते.
श्री.क्षीरसागर,जिल्हा व्यवस्थापक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे,अर्जदारांचे व सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानून मा. अध्यक्ष यांचे परवानगीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहिर केले. जिल्हा व्यावस्थापक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.)उस्मानाबाद यांनी कळविले आहे.