न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

लोहारा नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीच्या निवडी संपन्न

Post - गणेश खबोले

 

 

इकबाल मुल्ला

लोहारा/प्रतिनिधी

लोहारा नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडीसाठी लोहारा नगरपंचायत कार्यालयात दि.२३ फेब्रुवारी रोजी विशेष सभा संपन्न झाली.या नगरपंचायतवर शिवसेनेचे आ.ज्ञानराज चौगुले यांचे वर्चस्व असुन ५ समित्या पैकि ४ समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या नगरसेवकांची निवड झाली असुन एक समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम व अर्थ समिती सभापती अमिन सुंबेकर, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती समिती सभापतीपदी सौ.आरती ओम कोरे, सार्वजनिक पाणी पुरवठा व जलनिसरण समिती सभापतीपदी श्रीमती कमलताई राम भरारे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ.सारिका प्रमोद बंगले तर सार्वजनिक कर संकलन, विकास, नियोजन व शिक्षण समिती सभापती पदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांची निवड झाली. सभापती निवडीचे काम पिठासीन अधिकारी म्हणून लोहारा तहसीलदार संतोष रुईकर व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी काम पाहिले.

यावेळी नवनिर्वाचित सभापती यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष सौ. वैशालीताई खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, युवा नेते अभिमान खराडे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, प्रताप लोभे, नगरसेवक तथा जिल्हा बोर्ड संचालक अविनाश माळी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, नगरसेवक गौस मोमिन, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेवक अमिन सुंबेकर, नगरसेविका सौ. आरती कोरे, नगरसेविका श्रीमती शामलताई माळी, नगरसेविका सौ.आरती सतिश गिरी, नगरसेविका सौ.संगिता किशोर पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष के. डि.पाटील, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,कॉंग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक आरिफ खाणापुरे, नगरसेवक विजयकुमार ढगे, नगरसेवक प्रशांत काळे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक दिपक मुळे, ओम कोरे, सुरेश दंडगुले, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे, रोहन खराडे, प्रशांत थोरात, सकलेन शेख,कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे, नगरपंचायत शाखा अभियंता सुमित पाटील, स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे, लेखपाल दिपक मुंडे, सी.एल. टीसी शाखा अभियंता नावेद सय्यद, नवनाथ लोहार, पप्पु मुळे, मतीन शेख, गणेश काडगावे, श्रीशैल्य मिटकरी, मल्लिनाथ बिराजदार, विश्वनाथ बिराजदार, बाळु सातपुते, उमाकांत सगट, यांच्यासह शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————-–————-
सभापती व समिती सदस्य

सार्वजनिक बांधकाम व अर्थ समिती सभापती अमीन सुंबेकर सदस्य सौ.सुमन रोडगे, मयुरी बिराजदार, जालिंदर कोकणे,

सा.आरोग्य, स्वच्छ्ता व दिवाबत्ती समिती सभापती सौ.आरती ओम कोरे, सदस्य सौ.शमाबी शेख, श्रीमती कमल भरारे, आयुब शेख,

सार्वजनिक पाणी पुरवठा व जलनिसरण समिती सभापती श्रीमती कमल भरारे, सदस्य व सौ.शमाबी शेख, सौ.आरती कोरे, आयुब शेख,

महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी सौ.सारिका बंगले, सदस्य जालिंदर कोकणे, सौ. सुमन रोडगे, शमाबी शेख,

सार्वजनिक कर संकलन, विकास, नियोजन व शिक्षण समिती सभापती पदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख सदस्य गौस मोमिन, श्रीमती कमलताई भरारे, सौ. शमाबी शेख, यांची बिनविरोध निवड झाली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे