
लोहारा – प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील माकणी येथील कु ,सुषमा नेताजी कांबळे हीची पिपरी चिंचवड येथे पोलीस पदावर निवड झाली असून सुषमा ही गरीब कुटुंबातील असून तिचे वडीलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे,तिची आईने तिला मोल मजुरी करून शिक्षक दिलं व परिस्थिती गरीब असताना देखील शिकवून मोठं केलं व मोठी बहीण पूजा यांनीही खूप मोठी साथ दिली व तसेच तिने मोठ्या जिद्दीने व कष्टाने मिळून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत पोलीस क्षेत्रात कार्यरत झाली आहे, तिला पुणे येथील बार्टी या संस्थे मार्फत मार्गदर्शन पूर्वतयारी, शिष्यवृत्ती, पुस्तके व आर्थिक सहकार्य झाले आहे, तिच्या या निवडी बदल तिचा गावकऱ्यांच्या, व समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येत असून या निवडीबद्दल तिचा फेटा, शाल, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला असून तिचे सर्वत्र कौतुक होत,आहे, व अभिनंदन करण्यात येत आहे, यावेळी प्रा किशोर कांबळे, किशोर गायकवाड, रोहित गायकवाड, आकाश कांबळे, अविनाश कांबळे, धनंजय जाधव, राज्यपाल वाघमारे, आदीसह नागरिक उपस्थित होते,