शिवजयंती निमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठाणचे भव्यदिव्य मिरवणूक उत्साहात संपन्न….
Post - गणेश खबोले

मुरूम (डॉ रामलिंग पुराणे)
मुरूम येथील शिवप्रेमी प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि.१५ तारखेपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले, दि.१९ फेब्रुवारी वार रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुरूम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमीच्या वतीने महाराजांचे पुतळ्याचे प्रतिष्ठापणा करण्यात आले होते, संध्याकाळी विधीवत पूजा करून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आले, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, साठे चौक,अशोक चौक, टिळक चौक,किसान चौक,सुभाष चौक,गांधी चौक,हनुमान चौकातून ही भव्यदिव्य मिरवणूक संपन्न झाले, किसान चौकात शिवप्रेमी प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हिंदी व मराठी गीते, छत्रपती शिवरायां वरील गीताच्या तालावर तरूणाईने नाचण्याचा मनसोक्तपणे आनंद घेतला, प्रत्येक ठिकाणी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने पूजन करण्यात आले. मिरवणूक प्रसंगी सुभाष चौकातील एका चिमुकल्या बाळाने कु.अर्पिता ओमप्रकाश चिलोबा हिने भाषण केले. यादरम्यान नेताजी बेंडकाळे यांच्या घरातील भिंतीवर स्थापलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ.रंगनाथ जगताप,पवन इंगळे,अजित चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन संपन्न झाले, यावेळी नेताजी बेंडकाळे,तानाजी बेंडकाळे सह परिवार उपस्थित होते. जय शिवाजी जय भवानी च्या जयघोषात मुरूम नगरी दुमदुमली होती.मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने डॉ.रंगनाथ जगताप,पवन इंगळे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मिरवणुकी दरम्यान चोक सशस्त्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आले होते. महावितरण कर्मचारी, मुरूम नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे यांच्या उपस्थित व मार्गदर्शनाखाली नगर परिषद कर्मचारी यांचाही सहकार्य लाभले. मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवप्रेमी प्रतिष्ठाण पदाधिकारी,शिवभक्त, मराठा सेवा संघ, पोलीस प्रशासन,नगर परिषद कर्मचारी, महावितरण कर्मचारीने परिश्रम घेतले. अगदी उत्साही वातावरण आणि शांततेत मिरवणूक पार पडली.