
लोहारा / प्रतिनिधी
चौथ्या वेतन आयोगापासून लिपिकांवर अन्याय होत आहे. सातव्या वेतन आयोगामध्ये दुरूस्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बक्षी समितीने सादर केलेला अहवाल भ्रमनिरास करणार असल्याने जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेने सोमवार दि.२० रोजी लोहारा पंचायत समिती कार्यालया समोर निदर्शने केली.
लिपिक हा जिल्हा परिषदे च्या कामकाजामधील मुख्य कणा आहे.मात्र, लिपिकांवर वारंवार अन्याय होत आहे.त्यामुळे या विरोधातच निदर्शने करण्यात आली. तसेच बक्षी समितीचा निषेध ही यावेळी केला. अन्याय न थांबल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी लोहारा पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री कदम,गोपाळ लाळे,नितिन पाटील,लिंबराज साठे, यूनुस शेख,श्रीम अस्मिता सुरवसे, जीवन सुरवसे,बालाजी साळुंके, सचिन कुलकर्णी, श्याम काळे,वाहन चालक कांबळे, मुल्ला यांच्यासह पंचायत समितीं मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.