
मुरूम (डॉ रामलिंग पुराणे)
मुरूम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.१९ फेब्रुवारी रोजी मुरूम येथील मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. मुरूम पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ.रंगनाथ जगताप,चंद्रशेखर मूदकण्णा, प्रा.दत्ता इंगळे, अजित चौधरी, राजू मिनियार,राजेंद्र पाटील, संजय सावंत,श्रीधर इंगळे,बाबा कुरेशी,राम कांबळे, सुधीर चव्हाण,राहुल वाघ, आदींची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून जय शिवरायचे घोषणा देण्यात आले, यावेळी मोहन जाधव,किरण गायकवाड,श्रावण इंगळे, मारुती कदम सह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. यावेळी चिमुकल्या दीक्षांत आनंदकुमार कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोशाखात असलेले उपस्थिती आकर्षण ठरले…