नळदुर्ग येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा-रिपाइं (आठवले)ची मागणी

नळदुर्ग येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा-रिपाइं (आठवले)ची मागणी
वागदरी/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग बसस्थानका समोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात भारतिय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा असी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) शहरशाखा नळदुर्ग च्या वतीने लेखी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात रिपाइं (आठवले )शहरशाखा नळदुर्ग च्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद नळदुर्ग चे लक्ष्मण कुंभार याना एक लेखी निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, ऐतिहासिक,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय परिवर्तनवादी विचारांचा वारसा असलेल्या नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात भावी हजारो पिढीला प्रेरणा मिळावी या उदात्त द्यष्टीकोणातून नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविने ही काळाची गरज आहे.यावेळी जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष बाशिदभाई कुरेशी,शहर सरचिटणीस उत्तम डावरे,शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, शहर उपाध्यक्ष दत्ता सुरवसे, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, पँथर नेते मैनोदिन इनामदार, गोरख कांबळे,सह कार्यकर्ते उपस्थित होते.