ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघाचे कार्यक्षेत्रात जनावरांसाठी चारा (मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन द्या – चेअरमन बाळासाहेब शिंदे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघाचे कार्यक्षेत्रात जनावरांसाठी चारा (मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन द्या – चेअरमन बाळासाहेब शिंदे
तुळजापूर : प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघाचे कार्यक्षेत्रात जनावरांसाठी चारा (मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांना चेअरमन बाळासाहेब शिंदे यांनी निवेदन दिले आहे. निवेदनावर चेअरमन बाळासाहेब शिंदे ,संचालक प्रशांत पाटील,अंकुश पाटील, मोहन लोमटे,कांताबाई भुजबळ, रामेश्वर वैद्य,बापूराव शेंडगे, कल्याण घरवुडवे, तसेच माजी चेअरमन अशोक तांबारे ,संस्था प्रतिनिधी पी एस सुरवसे, दत्ता बागल,सुनिक वाकुरे,हमीद पठाण नवनाथ नांगरे,एच एम लोमटे,संतोष अतकरे,नागनाथ कोले निवेदन देताना उपस्थित होते.