न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आश्वासनाची पूर्तता न केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांरी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार

Post - गणेश खबोले

 

अलिबाग :अमूलकुमार जैन

अलिबाग तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मिनी सेविका येत्या २० फेब्रुवारी रोजी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती अंगणवाडी सेविका प्रतिनिधी जिविता पाटील यांनी दिली.
१२ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बैठकीत महिला व बालविकास विभाग मंत्री मंगलप्रभा लोंढा यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २६ जानेवारी रोजी मानधन वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचारी यांना देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष व सरकार विरोधी प्रचंड संताप निर्माण झाला आहे म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने दि २० फेब्रुवारी २०२३ रोजी विविध मागण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप करण्याचा ईशारा शासनाला दिला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या एक ताकदीने संपात शंभर टक्के भागीदारी करावी असे अहवान केले आहे. यावेळी अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय सेवेत वर्ग करून स्पे स्केल लागू करा, राज्य शासनाने इतर राज्य सरकार प्रमाणे मानधन वाढ दयावी,अंगणवाडी कर्मचारी यांना दरमहा पेन्शन लागू करा, अंगणवाडी कर्मचारी यांना ग्रॅज्युटी लागू करा, आहारातील दरवाढ करून इंधन दर वाढवावे, अंगणवाडी कर्मचारी यांना आजारपणची रजा मंजूर करा, मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करावे, पोषण ट्रकर मराठी करून दया, नवीन मोबाईल तातडीने दयावे इ. मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळ जवळ दोन लाख अंगणवाडी सेविका येत्या २० फेब्रुवारी रोजी संपावर जाणार आहेत. नवीन सरकारकडून अंगणवाडी सेविका यांना आशा होती की, वर्षानुवर्ष रखडलेल्या मागण्या काही अंशी तरी पूर्ण होतील परंतु नवीन सरकारने तर अंगणवाडी सेविकांची घोर निराशाच केली आहे इतकेच नाही तर सकारात्मक चर्चा करून अंगणवाडी सेविकांना त्यांचे मानधन वाढविण्यासंदर्भात शब्द दिला गेला परंतु दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे येत्या २० तारखेला आझाद मैदानात अंगणवाडी सेविका अधिक आक्रमक होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. वारंवार खोटी आश्वासने देवून सेविकांची दिशाभूल करीत आहेत. तुटपुंज्या मानधनात संसाराची गोळाबेरीज करणे कठीण झाले असल्याने आधीच गरिबीला कंटाळलेली नंदुरबार जिल्ह्यातील धाडगाव तालुक्यात अवघ्या ३३ वर्षाची अलका वळवी या सेविकेने घाटात उडी मारून आपले जीवन संपविले ही अतिशय वाईट बाब आहे. अजून असे किती बळी जातील? असा प्रश्न सेविकसंकडून होत आहे. जर शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येत्या निवडणुकीत दोन लाख अंगणवाडी सेविका निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहेत असा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रतिनिधी जीविता पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे