परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या अनाथ अभिषेक मगर व सांभाळ करणाऱ्या महानंदा माळी यांचा सन्मान !
Post-गणेश खबोले

लोहारा (अब्बास शेख))
- विद्या विकास प्रतिष्ठानचा पुढाकार !
ज्या निराधार विद्यार्थ्याने दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन केला व त्याच विद्यार्थ्याला आधार देणारी आत्या यांचा विद्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.
लोहारा हायस्कूल शाळेचे माजी शिक्षक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव माळी प्रतिष्ठानचे भारत काळे वसंत ठेले यांच्या पुढाकाराने दत्तक घेतलेल्या अभिषेक मगरचा व अभिषेक चा सांभाळ करणारी त्याची आत्या यांचा सन्मान औसा तालुक्यातील किनीनवरे या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी किनीनवरे जिल्हा परिषद शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गौतम मुगळे, उपाध्यक्ष विठ्ठल जाधव, सरपंच आदिनाथ जाधव, मेजर कालिदास माळी,केंद्रप्रमुख चांदपाशा शेख,मुख्याध्यापक आनंदा टाकेकर,अशोक पारगे, विद्या विकास प्रतिष्ठानचे निवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव माळी, भारत काळे, वसंत ठेले, दयानंद माळी, आत्माराम फुलसुंदर, राम फुलसुंदर, अभिषेक या विद्यार्थ्यांची आजी लक्ष्मीबाई मगर, सविता बनकर, कविता फुलसुंदर, तसेच उमेद कार्यकर्ती अनिता भोजने फनेपुर,पत्रकार अब्बास शेख सह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
विद्या विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेची स्थापना होऊन सहा वर्षे पूर्ण झाल्याने हायस्कूल लोहारा या शाळेच्या माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून या संस्थेची स्थापना केली आहे विद्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे
याचाच एक भाग म्हणून औसा तालुक्यातील किनीनवरे या गावातील अभिषेक मगर व मुकुंद मगर या दोन अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रतिष्ठानने घेतली आहे.
सन २०२४ च्या शालांत परीक्षेत अभिषेक ने चांगल्या गुणांनी यश मिळवले त्याच्या या यशात हैदराबाद येथे राहणारी अभिषेक ची आत्या श्रीमती महानंदा माळी त्यांचा देखील वाटा महत्त्वाचा असल्याने व या अनाथ अभिषेकचा पालन पोषण लहानपणापासून सांभाळ केल्याने या दोघांचाही सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने किनीनवरे या गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रांगणामध्ये करण्यात आला.
या वेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमानंतर प्रतिष्ठानच्या वतीने शालेय चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आला तर बाबुराव माळी यांच्यातर्फे त्यांची आजी कै अनुसया माळी,व दोन मामी कै सारजा माळी, कै शेशाबाई माळी यांच्या स्मरणार्थ शाळेतील लहान चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता
या प्रसंगी प्रास्ताविक निवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव माळी तर सूत्रसंचालन शिवाजी सारुळे व मनोज इंजे यांनी केले तर आभार भारत काळे यांनी मानले.