नळदुर्ग -किल्ल्यातील प्रसिध्द नर-मादी धबधबे वाहू लागले
नळदुर्ग -किल्ल्यातील प्रसिध्द नर-मादी धबधबे वाहू लागले

नळदुर्ग -किल्ल्यातील प्रसिध्द नर-मादी धबधबे वाहू लागले
नळदुर्ग : प्रतिनिधी
येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महाल येथील नर-मादी धबधबे गुरूवार ( दि. २६ ) रोजी सुरू झाले. पर्यटकांना किल्ल्यातील विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद दोन वर्षानंतर घेता येत आहे. मागील आठवडा भरापासून पाऊस सुरू असल्यामुळे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून वाहून पाणी बोरी नदीमार्गे किल्ल्यातील धबदधब्यातून वाहू लागले आहे. यामुळे पर्यटकांना नयनरम्य धबधबे पाहण्याचा आनंद घेता येत आहे.
नळदुर्ग येथिल बोरी ( कुरनूर ) धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहीत झाल्यानंतरच किल्ल्यातील सर्व धबधबे वाहतात, धरणाच्या वरील होर्टी, गंधोरा, चिकुंद्रा या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे बोरी धरण (कुरणूर प्रकल्प) पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे. यामुळे किल्ल्यातील ऐतिहासिक नरमादी धबधबे पाहण्यासाठी परिसरातील पर्यटक किल्ल्यात गर्दी करत आहेत.