दोन वर्षांच्या आतील मूकबधिर चिमुकुली वरील मोफत शस्त्रक्रिया यशस्वी…
समाजसेवक डॉ.पुराणे, वैधकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार...
उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरातील भुसणी गावातील दोन वर्षांची आतील चिमुकुली बाळ कु.सानवी शिवानंद धुतरे (०१ वर्ष ११ महिने) हि जन्मजात मूकबधिर होती. सदरील मुलीच्या पिताने विविध खाजगी दवाखान्यात उपचारासाठी धाव घेतली आणि गेले दोन वर्षांपासून मुलीला आजरापासून बरे होण्याकरिता आई-वडील धडपडत होते. कांही खाजगी दवाखान्यात त्यांना आठ ते दहा लाख रुपये खर्च येईल असे सांगण्याने, आई-वडिलांची बेताची परिस्थिती त्यांच्याकडे ही रक्कम उपलब्ध नसल्याने हताश झाले होते, सदरील विषयी त्यांनी मुरूम येथील शरणप्पा वाडे यांना सांगितले, वाडे यांनी मुरूम येथील समाजसेवक डॉ.रामलिंग पुराणे यांना धुतरे परिवराची परिस्थिती आणि त्यांच्या मुलीच्या आजाराबद्दल सांगितले, डॉ.पुराणे यांनी तात्काळ दखल घेऊन सदरील विषयी मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉ.सत्यजित डुकरे, वैधकीय अधिकारी डॉ. गुंडाजी कांबळे यांना माहिती देऊन त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना आहेत, त्या योजनेतून या मुलीचा मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी विनंती केली होती. सदरील विनंतीचे ग्रामीण रुग्णालयाने दखल घेऊन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.डुकरे, आर बी एस के टीम वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे प्राथमिक स्तरात तपासणी केल्याने कँझायटल डीफनेस हा आजार तपासणीत आढळला, सदरील मुलीवर कॉकहेलर शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञांनी सल्ला दिला त्यानुसार रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आरबीएसके व डीईआयसी अंतर्गत व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मोफत शस्त्रक्रियेसाठी कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईला पत्र पाठवून कळविले, दि.०६ फेब्रुवारी २०२३ रोजी सदरील चिमुकल्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आले आणि ती शस्त्रक्रिया यशस्वी ठरली, उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिलीच अशी घटना आहे जी दोन वर्षांच्या बाळावर शस्त्रक्रिया यशस्वी झाले, याबाबत मुलीच्या पालकांशी संपर्क साधला असता, सदरील बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून समाजसेवक डॉ.रामलिंग पुराणे, वैधकीय अधीक्षक डॉ.सत्यजित डुकरे, वैधकीय अधिकारी डॉ.गुंडाजी कांबळे यांचे आभार मानले. जिल्ह्याभरातून या चिमुकल्या बाळाला नवीन आयुष्य दिल्याने समाजसेवक,डॉक्टर यांचा अभिनंदन केले जात आहे.
सामाजिक कार्य करीत असताना अनेक विषय येत असतात आणि त्या प्रत्येक विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटच्या टप्प्या पर्यंत लढा चालू ठेऊन यशस्वी करतोत, जनसामान्यांच्या हक्कासाठी आम्ही लढत आहोत, आणि लढत राहू, ग्रामीण भागातील अनेक लोकांना शासकीय योजनांची माहिती नसते त्यामुळे त्यांचा आर्थिक पिळवणूक होतो, शासनाच्या प्रत्येक योजना घरोघरी पोहचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अखंडपणे चालू ठेऊ…..
-डॉ.रामलिंग पुराणे,
समाजसेवक,तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण
—————————————-
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, अनेक मोठं मोठे आजार बरे होतात, परंतु नागरिकांनी संयमता दर्शविणे गरजेचे आहे, शासनानेही अनेक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत, नागरिकांनी प्रथम प्राधान्य शासकीय रुग्णालयास द्यावे…
– डॉ.सत्यजित डुकरे,
- वैद्यकीय अधीक्षक,ग्रामीण रुग्णालय,मुरूम